महिंद्रा लवकरच आपली ऑफ रोडर एसयूव्ही थारचे न्यू जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. ऑगस्टमध्ये ही एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन महिंद्रा-थारचे फोटो लीक झाले आहेत. नवीन महिंद्रा थारला अनेकदा टेस्टिंगच्या वेळी पाहण्यात आलेले आहे. नवीन थारचे डिझाईन अद्याप समोर आलेले नाही. मात्र सध्याच्या मॉडेलप्रमाणेच याचे डिझाईन असेच असण्याची शक्यता आहे.
या महिन्यात लाँच होऊ शकते महिंद्राची ही एसयूव्ही
नवीन महिंद्रा थारमध्ये बीएस-6 कम्प्लांयट 2.2 लीटर डिझेल इंजिन मिळेल. जे 140एचपी पॉवर जनरेट करते. इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळेल. सोबतच नवीन एसयूव्हीमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळेल.
लीक झालेल्या फोटोमध्ये 18 इंचचे ब्लॅक एलॉय व्लिज दिसत आहेत. एसयूव्हीमध्ये एलईडी-डे टाईम रनिंग लाईट देखील मिळण्याची शक्यता आहे. नवीन डिझाईन डॅशबोर्डसोबत अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोसोबत टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये मल्टी-इंफॉर्मेशन डिस्प्ले, मॅन्युअल एसी, पॉवर फोल्डिंग विंग मिरर्स आणि मल्टीपल यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील.
सेफ्टीबद्दल सांगायचे तर यात ड्यूल फ्रंट एअरबॅग आणि एबीएस स्टँडर्ड मिळेल. टॉप व्हेरिएंट्समध्ये रियर पार्किंग कॅमेरा देखील मिळण्याची शक्यता आहे. नवीन थार फोर्स गुरखा आणि सुझुकी जिम्नीला टक्कर देईल.