सॅनिटायझरचा सतत वापर करणे ठरु शकते घातक


जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असतानाच प्रत्येक नागरिकाला सर्वोत्तोपरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यातच वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगितले जात असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण पूर्वीपेक्षा जास्त वेळा हात साफ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहोत. आपल्या जेव्हा-जेव्हा हात धुणे शक्य नसते तेव्हा आपण सॅनिटायझरद्वारे बॅक्टेरिया आणि व्हायरस दूर ठेऊ शकतो. जेव्हा आपण बाहेर जाता त्यावेळी हात स्वच्छ धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा उपलब्ध असतेच असे नाही. अशावेळी आपण आपल्यासोबत अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरचा वापर करु शकतो. किंबहुना आपल्याला त्यावरच अवलंबून राहावे लागते.

विशेषत: आपण जेव्हा कोरोनाला सामोरे जात असताना वारंवार सॅनिटायझर वापरण्याची शिफारस आरोग्य संस्था आणि सरकारकडून केली जात आहे. पण हँड सॅनिटायझर दररोज वापरण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. तेच दुष्परिणाम आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

धोकादायक विषाणू अथवा किटाणू नष्ट करण्यासाठी सॅनिटायझर हे प्रभावी आहे आणि त्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपला बचाव होता. परंतु यासंदर्भात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. शरीराच्या मायक्रोबायोम (सूक्ष्मजीव) काही प्रमाणात सॅनिटायझर परिणाम करू शकते. जो आपल्यासाठी योग्य ठरत नाही.

कोरोनासारख्या वाईट विषाणूंचा सॅनिटायझर नाश करते. पण त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे जीवाणू देखील नष्ट करतो. जर असे वारंवार घडले तर मोठी समस्या उद्भवू शकते. यावरील एकमात्र उपाय म्हणजे लोकांनी सॅनिटायझरचा वापर सावधगिरीने केला पाहिजे. आपले हात स्वच्छ करण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे पाणी आणि साबण उपलब्ध नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment