रिअलमीच्या एक्स ३ ने काढता येणार नक्षत्रांचे फोटो


फोटो साभार इंडिया टुडे
रिअलमी स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. कंपनीचा पुढचा स्मार्टफोन रिअलमी एक्स ३ सुपर झूम असेल असे संकेत कंपनीचे हेड माधव सेठ यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून शेअर केलेल्या फोटो मधून दिले आहेत. त्यांनी एक फोटो ट्विटरवरून शेअर केला असून हा फोटो रिअलमी एक्स ३ झूम मधून काढला गेल्याचे आणि ही फोनच्या स्टारी मोडची कमाल दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे सूचित केले आहे.


सेठ याना यातून रिअलमी एक्स ३ झूम मधून युजर आकाशगंगा आणि नक्षत्रांचे कमाल फोटो काढू शकतील असे सुचवायचे आहे. स्टारी मोड हा नाईट फोटोग्राफीसाठीचा खास मोड असून फोनला त्यासाठी ६० एक्स झूम दिला गेला असल्याची माहिती लिक झाली आहे. यामुळे युजर्सची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. हा फोन कधी लाँच होणार याची माहिती दिली गेलेली नाही मात्र भारतात तो लवकरच येईल असे संकेत दिले गेले आहेत. यापूर्वी रिअलमी ने ११ मे रोजी रिअलमी नार्झो १० सिरीज लाँच केली जात असल्याचे जाहीर केले आहे.

गिकबेंचवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार गतवर्षी कंपनीने सादर केलेल्या एक्स २ चे एक्स ३ हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. सुपरझूम सोबत कंपनी एक नॉर्मल एक्स ३ फोन सादर करेल. सुपरझूम मॉडेलला पॉवरफुल कॅमेरा सेटअप व पेरीस्कोप झूम लेन्स असेल असे समजते. फोनच्या अन्य फिचर्स बाबत माहिती दिली गेली नसली तरी या फोन साठी १०८ एमपीच प्रायमरी कॅमेरा असेल असा दावा केला जात आहे.

Leave a Comment