रात्री उघडणार मॉल्स आणि थिएटर्स?


फोटो साभार मनी कंट्रोल
करोना लॉक डाऊन मधून बाहेर हळू हळू बाहेर येण्यासाठी सरकार अनेक उपाय आणि योजना कार्यक्रम राबवीत आहे. त्यात आता गेले अनेक दिवस बंद असलेले मॉल्स, थिएटर्स आणि रिटेल शॉप उघडण्याबाबत विचार सुरु असून रात्रीच्या वेळी मॉल्स, थिएटर्स आणि रिटेल दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे समजते. अर्थात ही परवानगी फक्त ग्रीन आणि ऑरेंज झोन साठी असेल असेही सांगितले जात आहे.


फोटो साभार रॉयटर
अर्थात मॉल्स थिएटर्स आणि रिटेल दुकाने रात्री उघडण्याची परवानगी दिली गेली तरी तेथेही मास्क लावणे, सोशल डीस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असेल. ही योजना अमलात आली की व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे तसेच रात्री परवानगी दिल्याने वाहतूक समस्या आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे तुलनेने सोपे जाणार आहे असा विचार केला गेला आहे.

याबाबत शेवटचा निर्णय आरोग्य मंत्रालयाकडून घेतला जाइल आणि मग त्यानंतर गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील असेही समजते. श्रम मंत्रालयाच्या नियमानुसार रिटेल दुकाने २४ तास उघडी राहू शकतात, त्याचे फायदे असे की या ठिकाणी काम करण्याऱ्या लाखो लोकांना रोजगार सुरु होईल आणि व्यवसाय वाढेल. लॉक डाऊनचा सर्वाधिक परिणाम रिटेल दुकानांवर झाला असून ही दुकाने सुरु झाली तर मार्केटला दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment