फळांचा राजा आंबा असे वाढवितो त्वचेचे सौंदर्य


करोनामुळे सध्या देशात अनेक ठिकाणी अजूनही लॉकडाऊन आहे आणि त्यात उन्हाळयामुळे त्वचा घामट, चीपचिपी होत असल्याने त्रासात भर पडते आहे. या त्रासापासून तुमची सुटका करण्यास फळांचा राजा आंबा फार उपयुक्त आहे. ब्युटी पार्लर्स बंद असली तरी घरच्या घरीसुद्धा त्वचेची निगा राखण्यास आंबा अनेक प्रकारे वापरता येतो. कसे ते पाहू.

त्वचेसाठी पिकलेला तसेच कच्चा आंबा अतिशय फायदेशीर आहे. मुरूम पुटकुळ्यापासून ते कोरडी,निस्तेज त्वचा उजळ आणि चमकदार बनविण्यासाठी आंबा विविध प्रकारे वापरता येतो. उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचा विकारापासून आंबा सुटका देऊ शकतो. त्यामुळे एकदा त्याचा वापर करून बघणे शहाणपणाचे ठरेल.


आंबा खाण्याबरोबरच सौंदर्य वाढीसाठी वापरता येतो. आंब्याचा गर कुस्करून नियमितपणे फेसपॅक प्रमाणे चेहऱ्यावर लावून १० मिनिटांनी चेहरा धुवून टाकला तर त्वचेतील आर्द्रता वाढून त्वचा मऊ होते. स्कीन डीहायड्रेट होत नाही. त्वचेवरील डाग जाण्यासाठी रसात थोडा मध आणि लिंबू रस घालून त्याचा थर त्वचेवर द्यावा.


आंब्यामधील जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट गुणामुळे त्वचा स्वच्च होते तसेच आंब्याच्या गरात १ चमचा कणिक घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि थोडी सुकू लागली की चोळून काढावी आणि मग तोंड पाण्याने स्वच्छ धुतले तर डेड स्कीन निघून जाते आणि चेहरा उजळ, चमकदार दिसतो. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा.

चेहऱ्यावर पिम्पल्स असतील तर कच्ची कैरी गर एक कप पाण्यात उकळून ते मिश्रण अर्थे करावे आणि पिम्पल्स असतील तेथे लावावे. आठवड्यातून एकदा गर, अंड्यातील पांढरा बलक चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक तरुण दिसते.


केसांसाठी आंबा नैसर्गिक कंडिशनर आहे. दोन चमचे गरात १ चमचा दही आणि २ अंडी बलक एकत्र करून ही पेस्ट केसांवर ३० मिनिटे लावून ठेवावी आणि नंतर केस धुवावेत. केस चमकदार, मऊ आणि मजबूत होतात. उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर पिकलेल्या किंवा कच्या आंब्याचा गर, दुधातील क्रीम एकत्र करून त्वचेवर लावावे आणि १०- १५ मिनिटांनंतर अंघोळ करावी. दोन तीन वेळा हा उपाय केल्यास त्वचेचा काळवंडलेपणा कमी होऊन त्वचा उजळ बनते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment