चंद्रावर मानवी मुत्रापासून बनणार कॉंक्रीट


फोटो साभार नाव्भारत टाईम्स
अमेरिकेच्या चांद्र मोहिमेत चंद्रावरच्या मातीचे आणि खडकांचे अनेक नमुने पृथ्वीवर आणले गेले होते मात्र आता पृथ्वीवरून चंद्रावर अशी एक गोष्ट नेली जाईल ज्यामुळे चंद्रावर असंख्य मजबूत दगड किंवा कॉंक्रीट बनविता येईल असा दावा युरोपीय स्पेस एजन्सीने केला आहे. हा पदार्थ अन्य काही नसून मानवी मूत्र आहे. युरोपीय स्पेस एजन्सीने केलेल्या संशोधनात या मानवी मुत्रापासून चंद्रावर कॉंक्रीट बनविणे शक्य होणार आहे.

त्यामुळे वैज्ञानिक, भविष्यात चंद्रावर जेव्हा वसाहती करायची सुरवात होईल तेव्हा पृथ्वीवरून दगड, विटा नेण्यापेक्षा याच कॉंक्रीटचा वापर करता येईल असा दावा करत आहेत. शुक्रवारी या संशोधना संदर्भात माहिती दिली गेली. संशोधक मार्लीस इर्महॉफ या संदर्भात म्हणाले, मानवी मुत्रामध्ये युरियाचे प्रमाण भरपूर असते. चंद्रावरील माती मध्ये ते योग्य प्रमाणात मिक्स केले गेले तर त्यापासून मजबूत कॉंक्रीट बनू शकते. युरिया हायड्रोजन बॉन्ड्स तोडू शकते व फ्लुइड सारखे मिश्रण बनवून त्याचा चिकटपण कमी करता येतो. हे कॉंक्रीट बनविताना पाण्याची गरज कमी होते. माणसाच्या दीड लिटर मुत्रापासून हे काम सहज करता येईल असे दिसत आहे.

त्यामुळे अंतराळ वीरांचे मूत्र भविष्यात चंद्रावरच थोडा बदल करून वापरता येणार आहे. पृथ्वीवर युरिया औद्योगिक उर्वरक म्हणून पूर्वीपासूनचा वापरले जात आहे. चंद्रावर वसाहती करताना जी बांधकामे करावी लागतील त्यात चंद्रावरच बनविलेले हे कॉंक्रीट फार उपयुक्त ठरेल असाही दावा केला जात आहे.

Leave a Comment