दमदार फीचरसह शाओमीचा बहुप्रतिक्षित ‘एमआय 10’ 5जी भारतात लाँच

शाओमीने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन एमआय10 अखेर भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 हा दमदार प्रोसेसर देण्यात आलेला आहे.

एम10 च्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. दोन्ही मॉडेल कोरल ग्रीन आणि ट्विलाईट ग्रे रंगात उपलब्ध असतील. 8 मे पासून अ‍ॅमेझॉन आणि एमआयच्या अधिकृत वेबसाईटवर याचे प्री ऑर्डर सुरू झाले आहे. स्मार्टफोन ग्राहकांना कधी मिळेल, याची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही. लाँच ऑफरबद्दल सांगायचे तर फोनवर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डसोबत 3 हजार रुपये कॅशबॅक मिळेल. सोबतच 2,499 रुपयांचा 10000mAh वायरलेस पॉवरबँक मोफत मिळेल.

Image Credited – Gadgets NDTV

ड्युल नॅनो सिम सपोर्ट करणारा एमआय 10 स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर आधारित एमआययूआय11 वर काम करतो. फोनमध्ये 6.67 इंच फूल एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा  90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सँपलिंग रेट आणि 19.5:9 एस्पेक्ट रेशियो आहे. यात 1,120 निट्स पेक्षा अधिक ब्राइटनेस मिळते. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट सोबतच 8जीबी LPDDR5 रॅम देण्यात आलेली आहे.

Image Credited – Moneycontrol

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर एमआय 10 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातीत 108 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा 7 पीस लेंस आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) सोबत येतो. दुसरा कॅमेरा 123 डिग्री फिल्ड व्ह्यू आणि f/2.4 अपर्चर असणारा 13 मेगापिक्सल आणि इतर दोन कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. फोनमध्ये एक्स्पोजर, रंग, ब्राईटनेस आणि नॉईससाठी एआय 2.0 सॉफ्टवेअर देण्यात आलेले आहे.

Image Credited – India TV

कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ व्ही5.1, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाईप सी पोर्ट मिळेल. डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आले आहे. फोनमध्ये 4,780mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. जी 30W वायर्ड चार्जिंग, 30W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.

Leave a Comment