बाबो ! पठ्ठ्याने बनवला चक्क आईस्क्रीम समोसा, नेटकरी काय म्हणाले पहा

लॉकडाऊनच्या काळात लोक घरात कैद आहेत. अशात आपल्या वेळेचा सदुपयोग म्हणून वेगवेगळ्या, नवीन गोष्टी शिकण्याचा, बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कधीकधी हा प्रयत्न अगदी विचित्र टोकाला जाऊन पोहचतो. अशाच प्रकारे एका ट्विटर युजरने चक्क आईस्क्रीम समोशाचा फोटो शेअर करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

सर्वसाधारणपणे समोसा हा बटाट्याचा असतो. या व्यतिरिक्त पास्ता, चाउमीन असे समोसे देखील असतात. जे मिर्ची, चटणी सोबत तो खातात. मात्र या पठ्ठ्याने चक्क आईस्क्रीम समोसा शेअर केल्याने ते कोणाच्याच पचनी पडले नाही. हमजा गुलजार नावाच्या युजरने फोटो शेअर करत लिहिले की, ओरिया आईस्क्रीम समोसा…आहे का कोणी ? फोटोमध्ये दिसत आहे की समोसा आईस्क्रीमने भरलेला आहे.

हा आईस्क्रीम समोसा नेटकऱ्यांना देखील आवडला नाही. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर त्याला चक्क किचनमध्ये येण्यावरच बंदी घालावी असे म्हटले. मात्र काहींना हा समोसा आवडला देखील.

Leave a Comment