कोण आहेत फेसबुकच्या ओव्हरसाईट बोर्डातील एकमेव भारतीय सुधीर कृष्णास्वामी?

आपल्या प्लॅटफॉर्मवरील कंटेटवर लक्ष ठेवण्यासाठी व वादग्रस्त पोस्ट हटवायच्या की नाही, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने स्वतंत्र ओव्हरसाईट बोर्डाची स्थापना केली आहे. बोर्डातील 20 सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, ही संख्या 40 पर्यंत जाऊ शकते. हे बोर्ड फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गचा देखील निर्णय बदलू शकते. विशेष म्हणजे या बोर्डामध्ये सुधीर कृष्णास्वामी या भारतीयाचा समावेश आहे. सुधीर कृष्णास्वामी यांच्याविषयी जाणून घेऊया.

सुधीर कृष्णास्वामी हे नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिव्हर्सिटीचे वॉइस चान्सेंलर आहेत. तसेच भारतात एलजीबीटीक्यू+ आणि ट्रांसजेडर समुदायाला पाठिंबा देणारी संस्था सेंटर फॉर लॉ अँड पॉलिसी रिसर्चचे ते सह-संस्थापक आहेत. याआधी ते स्कूल ऑफ पॉलिसी अँड गव्हर्नंसचे डायरेक्टर आणि अझीम प्रेमजी यूनिव्हर्सिटीमध्ये कायदा व राजकारणाचे प्राध्यापक होते. कोलंबिया लॉ स्कूलमध्ये ते व्हिटिंग प्रोफेसर होते. त्यांनी अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील यूनिव्हर्सिटीमध्ये कायदा शिकवला आहे.

त्यांनी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिव्हर्सिटीमधून बीए एलएलबी आणि ऑक्सफर्डमधून बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ अँड डॉक्टर ऑफ फिलोसॉफी (लॉ) चे शिक्षण घेतले आहे. ते नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिव्हर्सिटी सर्वात तरूण वॉइस चान्सेंलर आहेत. त्यांनी  भारतीय घटनात्मक कायदा, बौद्धिक संपत्ती कायदा आणि न्यायालयीन भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर लेखन केले आहे.

Leave a Comment