ही एसयूव्ही धावणार सिंगल चार्जमध्ये 500 किमी

कार कंपनी स्कोडाने आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही स्कोडा इन्यॅकला प्रोटोटाईप फॉर्ममध्ये सादर केले आहे. ही इलेक्ट्रिक सिंगल चार्जमध्ये 500 किमी अंतर पार करू शकते. कंपनी इन्यॅक एसयूव्हीला तीन बॅटरी साईज आणि 5 पॉवर व्हेरिएंट्समध्ये सादर करणार आहे. कंपनी या एसयूव्हीचे उत्पादन या वर्षीच्या अखेर सुरू करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2021 मध्ये ही एसयूव्ही लाँच होईल. स्कोडा आपल्या स्थापनेच्या 125 वर्षांच्या निमित्ताने याचे फाउंडर्स एडिशन लाँच करणार आहे. या एडिशनमध्ये केवळ 1,895 यूनिट्स बाजारात आणले जातील, ज्यात खास फीचर्स मिळतील.

Image Credited – Navbharattimes

स्कोडा इन्यॅक इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या सुरूवातीचे व्हेरिएंट आयव्ही50 मध्ये 55kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. यात देण्यात आलेली रियर-माउंटेड इलेक्ट्रिक मोटार 109kW पॉवर देते. एकदा  फुल चार्ज केल्यावर कार 340 किलोमीटर चालेल. iV 60 व्हेरिएंटमध्ये 132kW पॉवर इलेक्ट्रिक मोटर आणि 62kWh बॅटरी देण्यात आली आहे. या मॉडेलची रेंज 390 किलोमीटर आहे. इन्यॅकच्या iV 80 व्हेरियंटमध्ये 150kW इलेक्ट्रिक मोटर आणि 82kWh बॅटरी देण्यात आली आहे. हे मॉडेल फुल चार्जिंगवर 500 किलोमीटर अंतर पार करू शकते.  एसयूवीचे 80X आणि vRS असे दोन अन्य व्हेरिएंट देखील आहेत. यात 82kWh बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही सेकंड इलेक्ट्रिक मोटर आणि ऑल-व्हिल ड्राईव्हमध्ये येतात.

Image Credited – Navbharattimes

कंपनीचा दावा आहे की एसयूव्हीचे टॉप व्हेरिएंट अवघ्या 6.2 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. याचा टॉप स्पीड ताशी 180 किमी आहे. फुल चार्जिंगमध्ये ऑल व्हिल ड्राईव्ह व्हेरिएंटची रेंज 460 किमीपर्यंत आहे. फास्ट चार्जरने एसयूव्ही 40 मिनिटात 80 टक्के चार्ज होईल.

Leave a Comment