फोटो गॅलरी ; लॉकडाउनमध्ये पार पडला अरुण गवळीच्या मुलीचा लग्नसोहळा


मुंबईच्या दगडी चाळीत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी योगिता ही विवाहबद्ध झाली. योगिता आणि तिचा पती अक्षय वाघमारे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.

मुंबईच्या दगडी चाळीत पार पडलेल्या विवाह सोहळ्यात वधू-वरांनी मास्क घालून सर्व विधी पार पाडले. याशिवाय लग्नात सामील झालेल्या दोन्ही कुटुंबातील लोकही मास्क परिधान केलेले दिसले.

दगडी चाळ येथे झालेल्या समारंभात दोन्ही कुटुंबातील काही लोक उपस्थित होते. यापूर्वी हा सोहळा मुंबईतील एका हॉटेलमध्ये होणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही.

योगिता आणि अक्षयने यांचा साखरपुडा डिसेंबर महिन्यातच झाला होता. अक्षय हा मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्या परिवाराशी संबधित असून योगिता व्यवसायाने वकील आहे आणि स्वयंसेवी संस्था चालवित आहे. योगिता आणि अक्षयच्या लग्नासाठी अरुण गवळीला 28 फेब्रुवारी रोजी पॅरोलवर सोडण्यात आले होते.

Leave a Comment