लॉकडाऊन इफेक्ट, कोट्यावधी कासवाची पिल्लं दिसली ओडिशामध्ये

लॉकडाऊनमुळे लोक घरातच असल्याने समुद्र किनाऱ्यावरील गर्दी देखील ओसरली आहे. यामुळे जलचर जीवांना कोणतीही समस्या येत नसून, लॉकडाऊनचा त्यांच्यावर खूपच चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी लाखो ओलिव्ह रिडल कासव अंडी देण्यासाठी ओडिशाच्या समुद्र किनारी परतले होते. आता असाच एक ओडिशाच्या समुद्र किनाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात दिसत आहे की आता हे अंड्यातून बाहेर पडलेले लाखो समुद्री कासव समुद्रात परतत आहेत.

तब्बल 7 वर्षांनी कासव अशाप्रकारे समुद्र किनारी अंडी देतानाचे दृश्य दिसले आहे. जवळपास 2 कोटी कासव अंडी देऊन समुद्रात परतल्याचे सांगितले जात आहे. आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की हे कासव समुद्राच्या दिशेने जात आहेत.

अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, बरं झाले माणसे घरात आहेत, असेही काहींनी म्हटले आहे.

Leave a Comment