‘माकडाचा चक्क एटीएम लूटण्याचा प्रयत्न, नेटिझन्स म्हणाले ‘Monkey Heist’

दिल्लीतील साउथ एवेन्यू येथील एका एटीएमची तोडफोड केल्याची घटना समोर आली होती. मात्र जेव्हा एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावेळी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या एटीएमशी एखाद्या व्यक्तीने नाही तर चक्क माकडाने छेडछाड केल्याचे समोर आले आहे. एटीएमशी माकडाला मस्ती करताना पाहून पोलीस देखील हैराण झाले.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माकड मशीनशी छेडछाड करत आहे व मशीनच्या एका पार्टला बाहेर काढून त्याची पाहणी करत आहे. माकड मशीनचा पुढील पॅनेल ओढतो व त्यानंतर निघून जातो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी माकड पैसे चोरी करत असल्याचे म्हटले तर काहींनी यासाठी माकडाला प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment