या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर असेल ‘शून्य’ – मूडीज

क्रेडिट रेटिंग एजेंसी मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिसने आर्थिक वर्ष 2021 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर शून्य राहील असे म्हटले आहे. आर्थिक आकडेवारी जर अशाच प्रकारे कमी होत राहिली तर देशाचे रेटिंग कमी होऊ शकते असेही म्हटले आहे. याआधी फिच रेटिंग्सने देखील असाच इशारा दिला होता.

मूडीजने म्हटले आहे की, दीर्घकाळ वृद्धी कमी राहिल्याने असे होऊ शकते. केवळ सरकारने लवकरात लवकर योग्य आर्थिक आणि संस्थात्मक धोरणे स्विकारल्यास यात बदल होऊ शकतो.

नोव्हेंबरमध्ये मूडीजने सोव्हेरिन रेटिंग्समध्ये बदल करत भारताचा ‘स्थिर’मधून ‘नकारात्मक’मध्ये समावेश केला होता. मूडीजने त्यावेळी भारताला Baa2 रेटिंग दिले होते. हा दुसरा सर्वात खालचा गुंतवणूक ग्रेड स्कोर आहे. लॉकडाऊनमुळे 121.5 मिलियन भारतीयांनी एप्रिलमध्ये नोकरी गमलव्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

मूडीजने म्हटले आहे की, भारताचे क्रेडिट प्रोफाईलला मोठ्या आणि वैविध्यपुर्ण अर्थव्यवस्था आणि स्थिर स्थानिक आर्थिक पाया कारणीभूत आहे.  उच्च सरकारी कर्ज, कमजोर सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधा, कमकुवत आर्थिक क्षेत्रांची शक्यता व्यक्त केली आहे. मूडीज अहवाल चिंताजनक असला तरी, मूडीजने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीची वृद्धि दर 6.6 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो असे म्हटले आहे.

Leave a Comment