… म्हणून येथे दारू खरेदी करणाऱ्याला लावली जात आहे शाई

मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यात अबकारी अधिकारी अभिषेक तिवारी यांनी दारू खरेदी करणाऱ्यांच्या हातावर शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, होशंगाबाद जिल्ह्यात दारू खरेदी करायला येणाऱ्या लोकांच्या बोटावर शाई लावली जात आहे. गरज पडल्यास या लोकांना ट्रेस करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ते म्हणाले की, याशिवाय ग्राहकांना दारूच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहिण्यास सांगण्यात आले आहे. नॉन कंटेनमेंट झोनमध्ये 50 दारूची दुकाने उघडण्यात आली आहे. सरकारच्या दिशानिर्देशांनुसार दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

दिल्लीत राज्य सरकारने दारू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन टोकन पद्धत सुरू केली आहे. या टोकनमुळे लांबलचक रांगेत उभे राहावे लागणार नाही.

Leave a Comment