आता मास्क न घालणाऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे लक्ष ठेवणार सरकार

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सरकारकडून नागरिकांना वारंवार मास्क घालण्यास सांगितले जात आहे. मात्र असे असताना देखील काहीजण विना मास्कचे बाहेर फिरतात. अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता फ्रान्स सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (एआय) मदत घेण्यास सुरूवात केली आहे. फ्रान्स मास्क न लावणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एआयवर आधारित सिक्युरीटी कॅमेऱ्याचा वापर करत आहे. या सॉफ्टवेअरचा वापर आधी देखील अनेक ठिकाणी करण्यात आलेला आहे.

काही दिवसांपुर्वीच पॅरिसच्या सेंट्रल चेटलेट-लेस हॉलेस स्टेशन तीन महिने याचे ट्रायल करण्यात आले. फ्रान्सच्या डाटाकालॅबने या प्रोग्रामला तयार केली आहे. जेणेकरून विना मास्कचे प्रवास करणाऱ्यांवर लक्ष ठेवता येईल.

डाटाकालॅबचे सीईओ जेव्हियर फिशर म्हणाले की, याचा उद्देश केवळ दररोज मास्क न लावणाऱ्या लोकांची संख्या मोजणे हा आहे. लक्ष ठेवण्याचा उद्देश एखाद्याची निगरानी करणे अथवा शिक्षा देणे हा नाही. दरम्यान, फ्रान्समध्ये सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावल्यास 145 डॉलर्सपर्यंत दंड आहे.

Leave a Comment