माझ्या बरोबर सुद्धा ‘कास्टिंग काउच’ झाले आहे – चित्रांगदा

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहने एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला आहे. चित्रांगदा म्हणाली की, असे लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतील. तिला देखील अशा अनेक अस्वस्थ स्थिती आणि प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. कारण तिने कधीच होकार दिला नाही. कॉर्पोरेट उद्योग खूपच खराब असल्याचे देखील तिने सांगितली. ती स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होती.

(व्हिडीओ सौजन्य – स्पॉबॉयई)

ती म्हणाली की, असे लोक प्रत्येक ठिकाणी भेटतात. माझ्या मॉडेलिंगपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या करिअरमध्ये अशा लोकांना प्रत्येक ठिकाणी पाहिले आहे. हे माझ्यासोबत देखील घडले. मात्र बॉलिवूड असे ठिकाण नाही, जेथे तुमच्यावर दबाव बनवला जातो. सर्वांसाठी येथे जागा आणि सन्मान आहे. तुम्हाला संधी गमलव्याचे दुखः होईल, मात्र हे तुम्ही स्वतः निवडलेले असेल. त्यामुळे तुम्ही याविषयी विचार करत नाही.

आपल्या अनुभवाविषयी ती म्हणाली की, वाईट तर वाटते. मी देखील अनेक प्रोजेक्ट्स गमावले आहेत. मात्र जर तुम्ही खूश असाल, तर तुम्ही त्यासोबत जायला हवे. मी येथे कोणाला जज करण्यासाठी नाही. या प्रकारेच जग चालते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः निवडाव्यात आणि ज्याप्रमाणे जगायचे आहे, त्याप्रमाणे जगावे.

Leave a Comment