1.29 कोटींची बीएमडब्ल्यू 8 सीरिज भारतात लाँच

बीएमडब्ल्यूने लॉकडाऊनमध्ये डिजिटल माध्यमातून एम8 कूपे आणि 8 सीरिज ग्रॅन कूपे भारतात लाँच केली आहे. पहिल्यांदाच 8 सीरिज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सीरिजमधील व्हेरिएंटची सुरूवाती किंमत 1.30 कोटी रुपये (एक्स-शोरुम) आहे. ही लग्झरी कार बीएस6 व्हेरिएंट्सह संपुर्ण बिल्ट अप यूनिट्स स्वरूपात येईल. बीएमडब्ल्यू 840आय ग्रॅन कूपेची किंमत 1.29 कोटी रुपये, बीएमडब्ल्यू 840आय ग्रॅन कूपे एम स्पोर्ट एडिशनची किंमत 1.55 कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू एम8 कूपे यांची किंमत 2.15 कोटी रुपये आहे.

Image Credited – Times of India

बीएमडब्ल्यू 8 सीरिज ग्रॅन कूपेचे फीचर –

या लग्झरी कारमध्ये बीएस-6 कम्प्लांयट 3 लीटर ट्विन पॉवर टर्बो टेक्नोलॉजी असणारे 6 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. बीएमडब्ल्यू 840आय ग्रॅन कूपे 340 एचपी पॉवर आणि 1600-4500 आरपीएमवर 500 एनएम टॉर्क जनरेट करते. कार अवघ्या 5.2 सेंकदांमध्ये ताशी 0 ते 100 चा वेग पकडते. यात 8-स्पीड स्टेपट्रोनिक ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल. यात कंफर्ट, स्पोर्ट आणि स्पोर्ट+ असे ड्राईव्हिंग मोड देण्यात आलेले आहेत.

Image Credited – autocarindia

कारच्या फीचरबाबत सांगायचे झाले तर यात 4 फ्रेमलेस दरवाजे, मोठे व्हिलबेस, कूपे-स्टाईल रूफलाईन मिळेल. शानदार इंटेरियर सोबतच दोन भागात मोठे पॅनोरमा ग्लास रुफ देण्यात आले आहे.

बीएमडब्ल्यू एम8 कूपेचे फीचर –

या कारमध्ये बीएस-6 कम्प्लायंट एमट्विनपॉवर टर्बो 4 लीटर, 8 सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 1,800-5,600 आरपीएमवर 600 एचपी पॉवर आणि 750 एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार अवघ्या 3.3 सेंकदांमध्ये ताशी 0 ते 100 किमी वेग पकडते. यात 8-स्पीड स्टेपट्रोनिक ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल. ऑल व्हिल ड्राईव्ह टेक्नोलॉजी एम xड्राईव्ह फ्रंट आणि रिअर एक्सेलला सेंकदात पॉवर पाठवते.

Image Credited – autocarindia

लूकबद्दल सांगायचे तर कारचा लूक बोल्ड आणि सुपरकार सारखा आहे. कार्बन-फायबरचा वापर करून बनविण्यात आलेले एम कार्बन-फायबर रूफचे वजन खूपच कमी आहे. कारमध्ये विविध रंगाचा पर्याय देखील मिळेल.

Leave a Comment