किम जोंगच नव्हे या नेत्यांनी देखील वापरला आहे बॉडी डबल

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन अनेक दिवस गायब होते. मात्र 20 दिवसांनी समोर आल्यानंतर देखील त्यांच्याविषयी एका विचित्र कारणामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे 20 दिवसांनी समोर आलेले किम जोंग उन नाही, तर त्यांचा बॉडी डबल असल्याचे सांगितले जात आहे. या दाव्यात किती सत्य आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र किम जोंग उन हे एकमेवश असे नेते नाहीत, ज्यांनी बॉडी डबलचा वापर केला आहे. याआधी देखील अनेक नेत्यांनी बॉडी डबलचा वापर केल्याचे समोर आले आहे.

Image Credited – mensxp

राणी एलिजाबेथ –

2017 मध्ये सर्वात प्रथम राणी एलिजाबेथ यांच्या डुप्लिकेट इला स्लॅक जगासमोर आल्या होत्या. 74 वर्षीय स्लॅक यांनी देखील आपण 30 वर्ष राणींच्या डुप्लिकेट म्हणून काम केल्याचे मान्य केले होते. त्या कार्यक्रमांमध्ये राणी एलिजाबेथ बनून 50 पेक्षा अधिक वेळा समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कसलेच पैसे घेतले नाहीत.

Image Credited – mensxp

व्लादिमीर पुतीन –

मागील अनेक वर्षांपासून रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे बॉडी डबल वापरत असल्याचे सांगितले जाते. मात्र पुतीन यांनी वारंवार हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. मात्र या वर्षीच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले की, 2000 साली त्यांना चेचन्यामधील युद्धाच्या वेळी बॉडी डबल वापरण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी नकार दिला होता. याशिवाय त्यांचा 2014 साली मृत्यू झाला असून, त्यांची जागी डुप्लिकेट असल्याचा दावा देखील अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Image Credited – mensxp

हिलरी क्लिंटन –

सप्टेंबर 2016 ला न्युयॉर्कमध्ये 9/11 च्या समारंभात हिलरी क्लिंटन बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी मुलीच्या घरी नेण्यात आले होते. मात्र काही वेळातच त्या बाहेर येऊन सर्वांना भेटल्या. तेव्हापासून त्यांनी बॉडी डबलचा वापर केल्याचा दावा केला जातो.

Image Credited – mensxp

उदय सद्दाम हुसैन –

सद्दाम हुसैनचा मुलगा उदय हुसैनने देखील बॉडी डबलचा वापर केल्याचे सांगितले जाते. 1990 च्या दशकात उदय हुसैनचा बॉडी डबल असलेला लतीफ याहीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. बॉडी डबल असल्याने त्याच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते.

Image Credited – mensxp

मुहम्मदु बुहारी –

2015 मध्ये नायजेरियाचे राष्ट्रपती झाल्यापासून बुहारी यांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. मात्र जेव्हा 2017 मध्ये ते ब्रिटनमध्ये उपचार घेण्यासाठी समोर आले, त्यावेळी त्यांनी बॉडी डबलचा वापर केल्याचा दावा केला जातो. त्यांच्या बॉडी डबलचे नाव जुबरी असून, तो मूळचा सुदानचा आहे. मात्र बुहारी यांनी हे दावे फेटाळले आहेत.

Leave a Comment