“X Æ A-12”… तुम्ही करुन दाखवा एलॉन मस्कच्या बाळाच्या नावाचा उच्चार


काही दिवसांपूर्वीच ख्यातनाम तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक एलॉन मस्क आणि त्यांची गर्लफ्रेंड ग्रिम्स यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून याबाबतची माहिती मस्क यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या बाळाचा फोटो देखील शेअर केला आणि त्यांनी आपल्या बाळाचे नाव देखील ही सांगितले. पण, त्यांच्या बाळाचे अनोखे नाव वाचून नेटकरी पार चक्रावून गेले आहेत.


मस्क यांच्या मुलाचे “X Æ A-12” असे नाव आहे. आपण आपल्यापैकी अनेकांना हे नाव घ्याचे कसे असा प्रश्न पडला असेल. तर या नावाचा नेमका अर्थ शोधायला सुरूवात अनेकांनी केली आणि त्यानंतर यावरुन अनेक जोक्स आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नावाचा नेमका अर्थ काय अशी विचारणा नेटकऱ्यांकडून वारंवार केली जात असल्याने अखेर मस्कची प्रेयसी गायिका ग्रिम्स हिने स्वतः एका ट्विटद्वारे नेटकऱ्यांना नावाचा अर्थ सांगितला. पण, ग्रिम्सने सांगितलेला अर्थही अनेकांना डोक्यावरुन गेला आणि त्यावरुनही आता अनेक जोक्स व्हायरल होत आहेत.

Leave a Comment