100 जीबी पेक्षा अधिक डेटा आणि मोफत कॉलिंग देणारे खास प्लॅन

लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन्स लाँच करत आहे. महिन्याला 100 जीबी पेक्षा अधिक डेटा देणाऱ्या अशाच काही प्लॅन्सविषयी जाणून घेऊया.

व्होडाफोनच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 4जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्लॅनचा कालावधी 28 दिवस आहे. प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा देखील फायदा मिळेल. सोबतच दिवसाला 100 एसएमएसची सुविधा देखील मिळेल. याशिवाय व्होडाफोन प्ले आणि झी5 चे मोफत स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.

व्होडाफोनच्या अन्य 2 प्लॅनमध्ये डबल डेटा ऑफर अंतर्गत दिवसाला 4 जीबी डेटा मिळत आहे. पहिला प्लॅन 499 रुपयांचा असून, याचा कालावधी 56 दिवसांचा आहे. दुसरा प्लॅन 699 रुपयांचा असून, या प्लॅनमध्ये 84 दिवस दररोज 4 जीबी डेटा मिळेल. या दोन्ही प्लॅनमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि व्होडाफोन प्ले, झी5 चे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल.

Leave a Comment