अपमानास्पद ट्विट केल्यावर अलर्ट करणार ट्विटरचे नवीन फीचर

सोशल मीडियावर एखाद्याला अपमानित करणे, एखाद्याविषयी अपमानास्पद टिप्पणी करणे, शिव्या देणे काही लोकांसाठी सर्वसामान्य झाले आहे. या समस्यावर उपाय शोधण्यासाठी सरकार आणि सोशल मीडिया कंपन्या वारंवार प्रयत्न करत आहेत. आता याचाच प्रयत्न म्हणून मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर एक नवीन फीचरचे टेस्टिंग करत आहे.

हे फीचर जारी करण्यात आल्यानंतर अपमानास्पद अथवा आपत्तीजनक ट्विट करणे किंवा रिप्लाय करण्यावर युजर्सला अलर्ट करण्यात येईल. ट्विट करत याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. ट्विटरने या फीचरबाबत म्हटले आहे की, जेव्हा आपण रागात असतो, त्यावेळी अनावश्यक गोष्ट बोलून जातो. तुमच्या रिप्लायचा पुर्नविचार करायला लावण्यासाठी खास फीचरचे टेस्टिंग करत आहे. जे तुम्हाला तुमचा रिप्लाय पब्लिश करण्याआधी पुर्नावलोकन करण्याचा पर्याय देईल.

आपत्तीजनक ट्विट आणि रिप्लाय केल्यावर युजर्सला अलर्ट मिळेल. ज्यात त्या ट्विट अथवा रिप्लायबद्दल परत विचार करण्यास सांगितले जाईल. दरम्यान काही दिवसांपुर्वीच ट्विटरने भडकाऊ ट्विटमुळे 4 ते 5 लाख अकाउंट्सवर कारवाई केली आहे.

Leave a Comment