वैज्ञानिकांनी शोधला पृथ्वीच्या सर्वात जवळील ब्लॅक होल

यूरोपियन अंतराळ वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून 1000 प्रकाश वर्ष लांब असलेला एक नवीन ब्लॅक होल (कृष्णविवर) शोधला आहे. हा ज्ञात असलेला पृथ्वीच्या सर्वात जवळचा ब्लॅक होल आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचे तर हा आकाशगंगेत आपला शेजारी आहे.

यूरोपियन शास्त्रज्ञ थॉमस रिव्हिन्स यांनी सांगितले की, याआधी पृथ्वीच्या सर्वात जवळचा ब्लॅक होल 3200 प्रकाश वर्ष दूर होता. नवीन ब्लॅक होल दक्षिण गोलार्धामध्ये टेलिस्कोपियम तारामंडळाचा भाग आहे.

वैज्ञानिकांनी जर्नल एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगितले की, याच्या आजुबाजूला इतर ब्लॅक होल देखील सापडण्याची शक्यता आहे. या नवीन ब्लॅक होलचा व्यास 25 मैल (जवळपास 40 किमी ) असू शकतो.

Leave a Comment