45 मिनिटात 5 लाखांच्या कर्जाची माहिती खोटी, एसबीआयचा खुलासा

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कोरोना व्हायरस महामारीच्या काळात योनो अ‍ॅपद्वारे अवघ्या 45 मिनिटात 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी समोर आली होती. माझापेपरने देखील या संदर्भात वृत्त दिले होते. मात्र आता ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. एसबीआयने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

एसबीआय अवघ्या 45 मिनिटात कमी व्याज दरात 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत असल्याचे अनेक माध्यमांनी वृत्त दिले होते. हे कर्ज मिळवण्यासाठी योनो अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र ही माहिती आता खोटी असल्याचे समोर आले आहे.

एसबीआयने ट्विट करत सांगितले की, इमर्जेंसी कर्जाची योजनाचे माहिती खोटी आहे. अधिकृत ट्विटर हँडलद्वारे देण्यात आलेल्या माहितीशिवाय इतर सोशल मीडियावर पसरणाऱ्या माहितीवर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये.

Leave a Comment