अरे देवा ! बघा हा जगावेगळा कॅरम, माणस झाले स्ट्रायकर-सोंगट्या

मागील जवळपास 40 दिवसांपासून लोक आपआपल्या घरात कैद आहेत. अशा स्थितीमद्ये चित्रपट, सीरिज, गेम खेळत लोक वेळ घालवत आहेत. तर काहीजण बोर्ड गेम जसे की कॅरम, मोनोपॉली, बुद्धीबळ, लूडो असे गेम्स खेळत आहेत. सोशल मीडियावर सध्या अशाच एका खेळाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कॅरम खेळतानाचा आहे. मात्र विशेष म्हणजे यात सोंगट्यांची जागा माणसांनी घेतली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की कॅरम बोर्डसाठी जमिनीवर रेखाटण्यात आले आहे. तर स्ट्रायकर आणि सोंगट्यांची जागा माणसांनी घेतली आहे.

हा व्हिडीओ कधीचा व कुठला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र पाहताना नक्कीच मजेशीर वाटत आहे.

Leave a Comment