जगभरातील दिग्गज गायिकांना मागे टाकत नेहा कक्करने रचला नवा विक्रम


बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच ती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. पण यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. जगभरातील टॉप सिंगरला मागे टाकत नेहाने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.


नेहाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. जगभरात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या गायिकांची यादी तिने या पोस्टमध्ये शेअर केली आहे. नेहा कक्कर या टॉप १० गायिकांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या चाहत्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

२०१९ मधील यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या जगभरातील टॉप १० गायिकांची यादी एक्स अॅक्ट्स चार्टने जाहिर केली आहे. गायिका कार्डी बीला ४.८ बिलियन व्ह्यूजसह या यादीमध्ये पहिले स्थान मिळाले आहे. तर नेहा कक्करला ४.५ बिलियन व्ह्यूज मिळाले असून या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. कि केरल जी, ब्लॅकपिंक, सेलेना गोम्ज, बिली एलिस यांना नेहाने मागे टाकल्यामुळे चाहते फार आनंदी असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment