… म्हणून पोलिसांनीच केले कन्यादान

नागपूर पोलिसांनी केलेल्या एका कामाचे सध्या कौतूक केले जात आहे. पोलिसांनी लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबाची भूमिका पार पाडली आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासावर बंदी असल्याने, नातेवाईक लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. लग्नाआधी वधूच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. त्यामुळे या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी नागपूर पोलीस पोहचले.

ट्विटरवर नागपूर पोलिसांनी या नवविवाहित जोडप्यांचा फोटो शेअर केला. नागपूर पोलिसांनी लिहिले की, वधूच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील कोणीच लग्नाला येऊ शकले नाही. नागपूर पोलिसांनी ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला. विवाहित जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नेटकऱ्यांनी देखील नागपूर पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या भूमिकेचे कौतूक केले. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment