भयानक वादळाने आकाश झाले ‘लाल’, नेटिझन्स म्हणाले ‘लाईफ इन अ डेझर्ट’

पश्चिम आफ्रिकेतील काही भागाला भयानक धुळीच्या वादळाला सामोरे जावे लागले आहे. पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशातील काही भाग धुळीच्या भिंतीनी काही मिनिटांसाठी झाकला गेला होता. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लालसर धूळीने घर, इमारतींना झाकून टाकले आहे. इमारतीपासून शेकडो मीटर उंच हे वादळ होते. या काळात धुळीचे वादळ पश्चिम आफ्रिकेसाठी सर्वसामान्य बाब असल्याचे सांगितले जाते. धुळीमुळे आकाशाचा रंग बदलून लाल झाला होता.

नेटकऱ्यांनी या वादळाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे भयानक वादळ कितीतरी मिनिटे होते व वादळानंतर मुसळधार पाऊस देखील पडला.

Leave a Comment