ब्रेझा-नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी येणार होंडाची ‘ही’ नवीन एसयूव्ही

होंडा लवकरच आपल्या नवीन एसयूव्हीला होंडा झेडआर-व्ही नावाने बाजारात लाँच करू शकते. काही दिवसांपुर्वीच कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये हे नाव रजिस्टर्ड केले आहे. होंडाची ही नवीन एसयूव्ही HR-V, CR-V, XR-V, UR-V, BR-V आणि WR-V या लाईनअपमध्ये सहभागी होईल. रिपोर्टनुसार ही नवीन एसयूव्ही काही बाजारांमध्ये डब्ल्यूआर-व्हीला रिप्लेस करेल.

होंडाची नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही न्यू-जनरेशन होंडा सिटीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात होंडा झेडआर-व्ही मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्युंडाई वेन्यू, फॉर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा एक्सयूव्ही300 आणि किआ सोनेट सारख्या एसयूव्हीला टक्कर देईल.

Image Credited – autocarindia

होंडा झेडआर-व्हीमध्ये 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल आणि 1.5-लीटर i-DTEC डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. ग्लोबल मॉडेलमध्ये 1.0-लीटर, 3-सिलिंडर टबोर्चार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील मिळू शकते, जे 122bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क जेनरेट करते. यात मॅन्यूअल, सीव्हीटी असे दोन्ही गियरबॉक्स पर्याय मिळतील. ही एसयूव्ही 2021 मध्ये लाँच होऊ शकते.

दरम्यान, होंडा न्यू जनरेशन एचआर-व्ही एसयूव्ही देखील लवकरच लाँच करणार आहे.

Leave a Comment