झुकरबर्गचाही निर्णय बदलू शकणाऱ्या फेसबुकच्या बोर्डात या भारतीयाचा समावेश

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या पहिल्या स्वतंत्र ओव्हरसाइट बोर्डातील (निरीक्षण मंडळ) सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. हे सदस्य एखादा वैयक्तीक कॉन्टेंटवरील निर्णय अथवा धोरणांमध्ये बदलांसंदर्भात कंपनीचा निर्णय बदलू शकतात.

फेसबुकने 20 सदस्यांच्या नावाची घोषणा केली असून, या सदस्यांमध्ये नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिव्हर्सिटीचे वाइस चान्सेंलर सुधीर कृष्णास्वामी हे एकमेव भारतीय आहेत. ते भारतातील घटनात्मक कायद्यातचे तज्ञ आहेत. या बोर्डातील सदस्यांची संख्या वाढून 40 पर्यंत जाण्याची शक्यता असून, बोर्ड पुढील काही महिन्यात प्रकरणांवर सुनावणी करण्यास सुरूवात करेल. फेसबुकवरील कंटेंट संदर्भात हे बोर्ड निर्णय घेईल.

या सदस्यांमध्ये कोलंबियन अटॉर्नी कॅटलिना बोटेरो-मारिनो, कोलंबियाचे कायद्याचे प्राध्यापक जमाल ग्रीने, स्टॅन्डफोर्ड लॉ स्कूलमधील घटनात्मक कायद्याचे प्राध्यापक मिशेल मॅकोनेल, डेनमार्कच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान हेल्ले थोर्निंग श्मिट, मानवाधिकाराच्या वकील अफिया असान्तेंवा असरे-के, यूनिवर्सिटी ऑफ ओक्लोमा कॉलेजचे कायद्याचे प्राध्यापक इव्हलियन अस्वाद, इंडोनेशियाचे पत्रकार इंडी बयूनी, ताईवानचे माजी नॅशनल कम्युनिकेशन रेग्यूलेटर कॅथेरिन चेन, पाकिस्तानी वकील निघत दाद, स्टँडफोर्डमधील कायद्याचे प्राध्यापक आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील वकील पॅमेला कार्लान, येमनच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि 2011 मध्ये शांतीचा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या अरब महिला तावाकोल कार्मान, केनियाचे वकील मैना किया, भारतातील नॅशनल लॉ स्कूलचे वाइस चान्सेंलर सुधीर कृष्णास्वामी, ब्राझिलियन वकील रोनाल्डो लेमोस, वकील ज्यूली ओव्होनो, इस्त्राईलच्या न्याय मंत्रालयाचे माजी डायरेक्टर जनरल इमी पालमोर, ब्रिटिश पत्रकार एलन रसब्रिजर, मानवाधिकारच्या यूरोपियन न्यायालयातील माजी न्यायाधीश अँड्रस साजो, कॅटो इंस्टिट्यूटचे उपाध्यक्ष जॉन सॅम्पल्स आणि ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीमध्ये कायद्याचे सहाय्यक प्राध्यापक निकोलस सुझोर यांचा समावेश आहे.

Leave a Comment