चीनमधील हजारो अमेरिकन कंपन्या भारतात आणण्याच्या प्रयत्नात सरकार

कोरोना व्हायरसवरून अमेरिका वारंवार चीनवर टीका करत आहे. या पार्श्वभुमीवर आता भारत चीनमधील 1000 पेक्षा अधिक अमेरिकन कंपन्यांना भारतात येण्यासाठी आकर्षित करत आहे. या कंपन्यांमध्ये मेडिकल डिव्हाईस कंपनी एबॉट लॅब्रोटोरिइज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चीन सोडण्याचा विचार करत असणाऱ्या हजारो कंपन्यांना सरकारने पायाभूत सुविधांसाठी खास ऑफर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारत मेडिकल इक्विपमेंट स्पलायर्स, फूड प्रोसेसिंग यूनिट्स, टेक्साटाईल्स, लेदर आणि ऑटो पार्ट मेकर्सला प्राधान्य देत आहे. या संदर्भात हिंदूस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

अमेरिकेने कोरोना व्हायरससाठी चीनला दोषी ठरवल्याने जागतिक व्यापार संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. जपानने चीनमधून कंपन्यांना हलविण्यासाठी 2.2 बिलियन डॉलर्सचे लक्ष ठेवले आहे. तर यूरोपियन यूनियनने चीनच्या पुरवठादारांवर अवलंबून राहणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य उत्पादन अमेरिकन कंपन्यांना भारतात आणण्यासाठी सरकारला यश मिळण्याची शक्यता आहे. मेडट्रोनिक आणि एबॉट या दोन्ही कंपन्या आधीपासूनच भारतात आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे चीनमधील उत्पादन भारतात हलवणे सोपे जाईल. जपान आणि अमेरिकेत परतण्याच्या तुलनेत भारतात या कंपन्यांनी आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित जमीन आणि प्रशिक्षित कर्मचारी मिळतील.  कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचे देखील आश्वासन देण्यात आलेले आहे.

Leave a Comment