लॉकडाऊन : 45 दिवसांपासून नवरीच्या घरीच अडकले वऱ्हाडी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात मागील 40 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. अचानक घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे अनेकजण घर सोडून इतर ठिकाणी अडकलेले आहे. असेच एक प्रकरण बिहारच्या बेगूसरायमधून समोर आले आहे. येथे उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातून आलेली वरात 45 दिवसांपासून अडकलेली आहे. परिस्थिती एवढी खराब झाली आहे की आता वराकडील लोकांचे पैसे समाप्त झाले असून, वधू पक्षाची देखील आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यांना आता वराकडील लोकांनी मीठ-भाकर खायला द्यावे लागत आहे.

बेगुसरायमधील बलिया येथील फतेहपूर गावातील ही घटना असून, येथे राहणाऱ्या खुशबू खातनूचे लग्न कानपूरच्या 30 वर्षीय इम्तियाजसोबत 21 मार्चला निश्चित झाले होते. इम्तियाज आई-वडिल आणि 10 जणांसोबत 20 मार्चला बेगुसरायला आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागल्याने सर्वचजण तेथेच अडकले. काही दिवस पैसे असल्याने समस्या आली नाही, मात्र आता वराकडील लोकांकडील पैसे संपल्याने समस्या निर्माण झाली आहे.

काही दिवस वधूकडील लोकांनी देखील वरातीच खर्च उचलला. मात्र त्यांचीही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने खाण्या-पिण्याचे हाल होऊ लागले आहेत.

काही दिवस स्थानिक प्रमुख रमाकांत यादव यांनी देखील मदत केली. नवरदेवाच्या आईचे म्हणणे आहे की, आता रोजा देखील मीठ-भाकरीने सोडावा लागत आहे. गावाचे प्रमुख आणि इतर लोकांनी वरातीमधील मंडळीना कानपूरला पाठवण्यासाठी विनंती केली आहे.

Leave a Comment