सोशल डीस्टन्सिंग पाळून द, कोरियात होतेय फुटबॉल लीग


फोटो साभार भास्कर
करोना महामारीचा उच्छाद अजून पूर्णपणे संपलेला नसतानाच द. कोरियात शुक्रवारपासून फुटबॉल सिझनची सुरवात केली जात आहे. अर्थात या सामन्यांना प्रेक्षक उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच संक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून खेळाडूंसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली आहेत.

नव्या नियमानुसार गोल झाला तरी खेळाडू आनंद व्यक्त करण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडणे, गळ्यात पडणे, हस्तांदोलन करणे अश्या कृती करू शकणार नाहीत. एकमेकांची बोलू शकणार नाहीत. कोरिया टीम कप्तानाने या अटी पाळणे अशक्य होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सामना संपल्यावर सर्व खेळाडू, स्टाफ यांचे शरीर टेम्परेचर मोजले जाणार असून एखाद्याला ताप आल्याचे दिसले तर टीममधील सर्व खेळाडू, स्टाफ, कोच, विरुद्ध टीम मधील खेळाडूना दोन आठवडे ब्रेक दिला जाणार आहे.

करोना उद्रेकानंतर फुटबॉल स्पर्धा घेणारा द. कोरिया पहिलाच देश बनला आहे. बेलारूस, तुर्कमेनिस्तान, तैवान येथे फुटबॉल स्पर्धांवर बंदी नव्हती. के लीग आशियातील पहिली मोठी फुटबॉल स्पर्धा असून युरोप मधील बडी लीग बंद केली गेली आहे.

जर्मनीमध्ये बुंदेजीलगा स्पर्धा परत सुरु करण्या विषयी योजना आखली जात असल्याचेही समजते. द. कोरियातील शुक्रवारी सुरु होत असलेल्या के लीगचा पहिला सामना जियोनबक व ब्ल्यूकिंग यांच्यात होत असून त्याचे लाईव प्रसारण फेसबुक आणि युट्युब वर केले जाणार आहे. १० विदेशी ब्रॉडकास्टर ही या सामन्याचे प्रसारण करणार आहेत. कोरिया मध्येही चीन नंतर कोविड १९ चा मोठा प्रकोप झाला होता मात्र या देशाने अधिक प्रमाणात चाचण्या आणि उपचारांनी या साथीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे.

Leave a Comment