मसाबा गुप्ताने पोलीस अधिकाऱ्यांना डोनेट केले डिझायनर मास्क


फोटो साभार रिपब्लिक न्यूज
बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची कन्या मसाबा हिने करोना संक्रमणात तिचे योगदान दिले असून तिने डिझायनर मास्क पोलीस अधिकाऱ्यांना डोनेट केले आहेत. करोना विरुध्दच्या लढाईत प्रत्येक थरातील नागरिक स्वतःच्या कुवतीनुसार योगदान देत आहेत. बॉलीवूड कलाकारही त्यात मागे नाहीत.

मसाबा ही उत्तम डिझायनर असून अनेक सेलेब्रिटीसाठी ती ड्रेस डिझाईन करते. मसाबाने डिझायनर मास्क तयार करून ते महीला पोलीस अधिकाऱ्यांना डोनेट केल्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती म्हणते, हे काम करताना मला खूप आनंद होतोय. आजपर्यंत अनेक सेलेब्रिटीसाठी मी काम केले आहे पण आजचा हा क्षण माझ्या कायम आठवणीत राहील. या पोलीस अधिकारी देशातील नागरिक आणि देशहित राखण्यासाठी न थांबता सतत गेले काही दिवस काम करत आहेत. त्यांचे आभार मानण्यासाठी मी हा मार्ग निवडला आहे.

मसाबा सांगते हे मास्क नॉन सर्जिकल आणि धुवून पुन्हा वापरता येणारे आहेत. हे मास्क तिने विक्रीसाठीही ठेवले असून त्यातून जे पैसे मिळतील ते चॅरिटी साठी दिले जाणार आहेत. मसाबा ही फॅशन इंडस्ट्री मधील नामवंत डिझायनर म्हणून ओळखली जाते.

Leave a Comment