आता फिचर फोन आणि लँडलाईनवरही आरोग्यसेतू अॅप उपलब्ध


फोटो साभार आरोग्य जनकारी
कोविड १९ संकटात भारत सरकारने अँड्राईड आणि आयओएस स्मार्टफोन साठी उपलब्ध केलेले आरोग्य सेतू अॅप आता फिचर फोन आणि लँडलाईनवरही उपलब्ध करून दिले आहे. ही टोलफ्री सेवा असून त्यासाठी युजरने १९२१ या नंबरवर मिसकॉल द्यायचा आहे. युजरने मिस कॉल दिल्यावर त्याला कॉल बॅक येणार असून त्यावर युजरच्या आरोग्यासंदर्भातली सर्व माहिती प्रश्नोत्तर स्वरुपात विचारली जाणार आहे. त्यानंतर एक एसएमएस केला जाईल आणि युजरला आरोग्य संबंधीचे अॅलर्ट येत राहणार आहेत. ११ क्षेत्रीय भाषेत ही सुविधा मिळणार आहे.

प्रश्नउत्तर या स्वरुपात मिळालेली युजरची माहिती आरोग्यसेतू डेटाबेस मध्ये साठविली जाणार आहे आणि त्यानंतर युजरला आरोग्य संबंधीचे अॅलर्ट येत राहणार आहेत असे स्पष्ट केले गेले आहे. निती आयोगाने आरोग्य सेतू बरोबर आरोग्य मित्र ही वेबसाईट सुद्धा सुरु केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युजरला घरबसल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. युजरला लॉक डाऊन काळात वा नंतरही घराबाहेर पडावे लागू नये यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

या सेवेसाठी टाटा हेल्थ, कनेक्टसेन्सा, स्टेपवन, स्वस्थ फौंडेशन याच्याबरोबर सहकार्य करार केला गेला असून यामुळे युजरला घरीच लॅब टेस्ट सुविधा बुक करणे, ऑनलाईन औषधे मागविणे, आणि ऑनलाईन डॉक्टर कन्सलटेशन सुविधा मिळणार आहे. ही सेवा सध्या फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत मिळू शकणार आहे.

Leave a Comment