देशभरात लागू होणार रेशन कार्ड पोर्टेबिलिटी, असा मिळणार फायदा

कोरोना संकटाच्या काळात सध्या देशभरात रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची जोरदार चर्चा सुरू आहे. देशातील 15 पेक्षा अधिक राज्यांनी रेशन कार्ड पोर्टेबिलिटीला परवानगी दिली आहे. रेशन कार्ड पोर्टेबिलिटी नक्की काय आहे, जाणून घेऊया.

ज्याप्रमाणे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी करतात, त्याच प्रमाणे रेशन कार्ड देखील पोर्ट करता येणार आहे. रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्ये तुमचे कार्ड बदलणार नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यास, एकच रेशन कार्ड वापरू शकता. थोडक्यात, एकाच कार्डवरून कोणत्याही राज्यातून धान्य घेता येईल.

1 जूनपासून ही योजना लागू होईल. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाना, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि त्रिपुरा अशा एकूण 17 राज्यांचा यात समावेश आहे. सरकारने याला ‘एक देश, एक रेशन कार्ड’ असे नाव दिले आहे. या योजनेद्वारे भ्रष्टाचार कमी होईल व बनावट रेशन कार्ड बनणार नाही, अशी सरकारला आशा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 75 कोटी लाभार्थी या कक्षेत येतात.

Leave a Comment