दक्षिण चीन सागरात अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव

दक्षिण चीन सागरावरून जगातील दोन शक्तीशाली राष्ट्र अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढतच चालला आहे. अमेरिकेने आरोप केला आहे की चीनचे सैन्य दक्षिण चीन सागरात आक्रमव व्यवहार करत आहे. तर चीनने आरोप केला आहे की, राष्ट्रपती निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ट्रम्प प्रशासन वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करत आहे. वाढत्या ताणतणावाच्या परिस्थितीत चिनी युद्धनौकांनी युद्धाचा सराव केला आहे. तर अमेरिकेने अलास्कामध्ये एफ -35 लढाऊ जेटला अलर्ट मोडमध्ये तयार ठेवले आहे.

चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर म्हणाले की, चीनचे सैन्य दक्षिण चीन सागरात आक्रमक वागत आहे. चायनीज कम्युनिस्ट पक्षाने आपल्यावरील आरोपांवर लक्ष हटविण्यासाठी आणि प्रतिमा सुधरविण्यासाठी चुकीच्या सुचना पसरविण्यास सुरूवात केली आहे. फिलिपाईन्सच्या नौदलाच्या जहाजांना धमकावणे, मासेमारी करणाऱ्या व्हिएतनामच्या नौकांना बुडवणे आणि अन्य देशांना तेल व गॅस संबंधी गतिविधिबाबत धमकावणे, हेच दर्शवते.

एस्पर म्हणाले की, चीन व्हायरसबाबत अधिक पारदर्शी असतात तर व्हायरसला आधीच समजता आले असते व जग या स्थितीमध्ये नसते.

चीनच्या विमानवाहू जहाज, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी युद्ध अभ्यास केला. चीनच्या सैन्याचे म्हणणे आहे की, आम्ही अमेरिकेसोबत कोणत्याही युद्धाला तयार आहोत. अमेरिकेची विमाने देखील नियमित या भागात दौरा करत आहेत.

Leave a Comment