लष्कराने केला हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकूचा खात्मा

मागील 8 वर्षांपासून फरार असणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्याच्याच गावी बेगपोरा येथेन सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत रियाज मारला गेला.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आधीच खोऱ्यातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचे, जम्मू आणि काश्मिर प्रशासनाने सांगितले आहे. सोबतच लोकांच्या हालचालींवर देखील निर्बंध आहेत.

रियाज नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दींनचा ऑपरेशनल कमांडर होता. नायकूवर 12 लाख रुपयांचे बक्षीस देखील होते व मागील 8 वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता. जुलै 2016 मध्ये हिज्बुल मुजाहिद्दींचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर रियाज नायकूला मुजाहिद्दींनचे कमांडर बनविण्यात आले होते.

रियाज काश्मिरमध्ये सर्वाधिक काळ सक्रिय असणारा दहशतवादी असल्याचे सांगितले जाते. त्याला मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या ए++ कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या किडनॅपिंग आणि हत्येमध्ये त्याचा सहभाग होता.

Leave a Comment