हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज हा आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. आता टॉम क्रूज आपले हे अॅक्शन स्टंट पुढील पातळीवर नेणार आहे. टॉम आता चक्क अंतराळात चित्रपटाची शूटिंग करणार असून, यासाठी त्याने एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सशी भागीदारी केली आहे.
चक्क अंतराळात चित्रपटाचे शूटिंग करणार ‘हा’ अभिनेता
क्रूज आणि स्पेस एक्स चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थ नासाबरोबर चर्चा करत आहेत. हा एक अॅक्शन-अॅडवेंचर चित्रपट असल्याचे सांगितले जात असून, अद्याप कोणताही हॉलिवूड स्टुडियो याच्याशी जोडला गेलेला नाही.
क्रूज आपल्या चित्रपटांमध्ये खरतनाक स्टंटसाठी ओळखला जातो. 2011 मध्ये मिशन इम्पॉसिबल :’ घोस्ट प्रोटोकॉल’मधील बुर्ज खलिफावरील अॅक्शन सीन पासून ते 2015 च्या ‘रोग नेशन’मध्ये विमानाला लटकणे असेल, अशा अनेक स्टंटसाठी क्रूज ओळखला जातो. अनेकदा स्टंट करताना त्याला दुखापत देखील झालेली आहे.
टॉम क्रूज सध्या आपला आगामी चित्रपट ‘टॉप गन : मॅव्हरिक’च्या रिलीजची वाट पाहत आहे. कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाला असून, जूनमध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय क्रूज मिशन इम्पॉसिबल सीरिजवर देखील काम करत आहे.