अशक्त होत चालला आहे सुर्य, वैज्ञानिकांचा दावा

पृथ्वीवरील जीवनांसाठी सुर्याची उर्जा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र एका नवीन अभ्यासात अंतराळातील इतर ताऱ्यांच्या तुलनेत सुर्य अशक्त होत चालल्याचे समोर आले आहे. जर्मनीच्या मॅक्स फ्लँक इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी सुर्याची तुलना त्याच्या सारख्यात अंतराळातील इतर ताऱ्यांशी केली व त्यांचे म्हणणे आहे की सुर्य त्या ताऱ्यांच्या तुलनेत 5 पट अशक्त झाला आहे.

नासाच्या निवृत्त झालेल्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या डाटाचा वापर करून जर्मनीच्या वैज्ञानिकांनी मिल्की वे मध्ये असलेले सुर्यासारख्या इतर ताऱ्यांसोबत तुलना केली. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे स्पष्ट नाही की सुर्य 9000 वर्षांमध्ये एका शांत कालावधीमधून जात आहे अथवा याचा प्रकाश सामान्य ताऱ्यांच्या तुलनेत कमी झाला आहे.

वैज्ञानिकांनी सुर्यासारख्या 2,500 पेक्षा अधिक ताऱ्यांचा अभ्यास केला. याद्वारे समोर आले की सुर्याचे प्रकाशकिरण आधीच्या तुलनेत कमी झाले आहे. डॉ. टिमो रीनहोल्ड म्हणाले की, अंदाज आहे की सुर्य मागील काही वर्षांपासून शांत टप्प्यातून जात आहे. सुर्य जवळपास 4.6 बिलियन वर्ष जुना आहे व याच कारणामुळे सुर्यासाठी 9 हजार वर्ष खूपच कमी आहेत.

9000 वर्षांपुर्वी सुर्य किती सक्रिय होता, हे मोजण्याची कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे इतर ताऱ्यांशीच तुलना करावी लागत आहे. सुर्य कमी सक्रिय का झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, असे होऊ शकते की सुर्य इतरांच्या तुलनेत वेगळा आहे. कदाचित यामुळे असा व्यवहार करत असेल. सुर्य अशक्त होत चालला असला, तरी चिंतेची बाब नाही, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

Leave a Comment