टॉम हँक्सचे शेजारी होणार प्रिन्स हॅरी आणि मेगन

ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांना शाही परिवारापासून वेगळे होऊन आता अनेक महिने झाले आहेत. सध्या हॅरी आणि मेगन हे साधे जीवन जगत आहेत. मात्र ते शानदार हवेलीच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही लॉस एंजिलेसमधील पॅसिफिक पालिसॅड्सजवळील 6 बेडरूम असणाऱ्या लग्झरी हवेलीला खरेदी करण्याचा विचार करत आहेत.

या शानदार हवेलीमध्ये एक स्विमिंग पूल, सिनेमाहॉल, 1 एकरचे गार्डन, प्ले ग्राउंड आणि समोर समुद्राचे दृश्य आहे. या बंगल्याचे सध्याचा मालक फास्ट अँड फ्यूरियस चित्रपटाचे निर्माते स्टिव्ह चॅसमॅन आहेत. तर टॉम हॉक्स आणि बेन एफ्लेक शेजारी आहेत.

मेगनला आपल्या 63 वर्षीय आईला आपल्या सोबत ठेवायचे आहे, कारण त्यांचा मुलगा आर्ची अजून लहान आहे.

Leave a Comment