अरेच्चा ! गावाला परतलेल्या मजूराने क्वांरटाईनसाठी थेट झाडावरच बांधले घर

शहरातून गावाकडे परतणाऱ्या लोकांना काही दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. कोठे प्रशासनाकडून सरकारी शाळेत अशा लोकांची सोय केली जाते, तर काही ठिकाणी नागरिक स्वतःलाच घरात आयसोलेट करतात. मात्र राजस्थानच्या भीलवाडा येथील शेरपुरा गावातील चक्क स्वतःला झाडावर क्वारंटाईन करून घेतला आहे. हा युक अजमेरवरून आपल्या गावी आला आहे.

कमलेश मीणा हा युवक किशनगढवरून 160 किमी अंतर पायी पार करून आपल्या गावी पोहचला. मात्र कमलेशला गावात येण्यास मनाई करण्यात आली. त्याला आधी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले. यानंतर आरोग्य सेंटर्सच्या कर्मचाऱ्यांना बोलवून त्याचे सँपल घेतले व त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास सांगितले. गावकरी आणि आरोग्य सेंटर्सच्या वादामध्ये कमलेशने मात्र शेतात राहण्याचा निर्णय घेतला.

कमलेशने गावापासून 1-2 किमी अंतरावरील शेतातील झाडावर स्वतःला क्वारंटाईन करण्याची ईच्छा व्यक्त केली. गावकऱ्यांनी देखील या परवानगी दिली. यानंतर कमलेशन झाडावरच काही लाकडे आणि प्लास्टिक शीटद्वारे घर बनवले. तेथे तो 14 दिवस राहीला.

कमलेशचे वडील रोज त्याला सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत त्याला जेवण देत असे. आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम रोज त्याची तपासणी करत असे. आता कमलेश व्यवस्थित असून, कुटुंबासोबत राहत आहे.

Leave a Comment