आता व्हिडीओ कॉलद्वारे खरेदी, घरी बसल्या मिळणार या कंपनीच्या कार

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने लॉकडाऊन नंतरच्या स्थितीसाठी तयारी सुरू केली आहे. कंपनी डिजिटाइज होत आहे. कंपनी आपल्या कर्मचारी आणि डीलर नेटवर्कला ऑनलाईन गाड्या विकण्यास शिकवत आहे. कंपनी आपल्या डीलर नेटवर्कला खास प्रोग्रामंतर्गत ट्रेनिंग देत आहे. ज्यात डिजिटल व्यापाराची पद्धत कशी बदलता येईल, हे सांगितले जात आहे. लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर कंपनी संपुर्ण नेटवर्कमध्ये हा प्रोग्राम लागू करेल.

मारुतीने या प्रोग्रामसाठी आपल्या डीलर्सला एक मेमो देखील पाठवला आहे. ज्यात लॉकडाऊननंतर व्यवसाय वाढविण्यासाठी नवीन पद्धती शोधण्यास सांगितले आहे. ग्राहकांना वेबसाईटवर जाण्यास प्रेरित करणे, वाहनांची बुकिंग, विमा आणि एक्सेसरीज खरेदी करण्यास प्रेरित करणे, या गोष्टींचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

कंपनीच्या न्यू स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्ससोबत (एसओपी) वाहनाच्या विक्री आधी आणि नंतरची प्रक्रिया पुर्णपणे डिजिटल करण्यात यावी. सध्या कंपनी टेस्ट्र ड्राईव्ह व्यतिरिक्त 28 पॉईंट्समध्ये डिजिटलवर लक्ष केंद्रीत करत आहे. एसओपी अंतर्गत ग्राहकांना शोरूमला भेट देण्यासासाठी ऑनलाईन अपाइंटमेंट करण्यास सांगितले जाईल. सोबतच ई-ब्रॉशर आणि ई-कोटेशन्स ऑनलाईन दिले जाईल. प्रोजेक्ट डिस्प्लेसाठी कंपनी स्टॅटिक डेमो, प्रोडक्ट व्हिडीओची मदत घेईल. रिलेशनशिप मॅनेजर्सला व्हिडीओ कॉल्सद्वारे ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व डेमोसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

कंपनीने नवीन ओसीपीमध्ये डीलर्सला शोरूमच्या आत व बाहेर आरोग्य व सुरक्षेसाठी नियम पाळण्यास सांगितले आहेत. यात डेमो आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वाहनांचे सॅनिटायझेशनचा देखील समावेश आहे.

Leave a Comment