पहिल्यांदाच ऑनलाईन होणार अ‍ॅपलची डेव्हलपर कॉन्फ्रेंस WWDC20

अ‍ॅपलने आपली वार्षिक डेव्हलपर कॉन्फ्रेंस WWDC म्हणजेच वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फ्रेंसची घोषणा केली असून, या वर्षी 22 जूनला ही कॉन्फ्रेंस सुरू होईल. आतापर्यंत यासाठी कंपनी इव्हेंटचे आयोजन करत असे. मात्र यंदा ही कॉन्फ्रेंस ऑनलाईन होणार आहे. म्हणजेच यासाठी डेव्हलपर्सला अमेरिकेला जावे लागणार नाही व कोणतेही तिकीट घ्यावे लागणार नाही. यात कोणीही सहभागी होऊ शकते.

अ‍ॅपलचे फिल शिलर या डेव्हलपर कॉन्फ्रेंसबाबत म्हणाले की, ही कॉन्फ्रेंस जूनमध्ये होईल व हा पुर्णपणे एक नवीन अनुभव असेल. सध्याच्या स्थितीमुळे याला ऑनलाईन इव्हेंट बनवण्यात आले आहे.

अ‍ॅपलने म्हटले की, WWDC20 हा आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा इव्हेंट असेल. या दरम्यान 23 मिलियनची ग्लोबल डेव्हलपर कम्युनिटी एक जून आधीसोबत असेल व अ‍ॅपल प्लॅटफॉर्मच्या भविष्याविषयी चर्चा केली जाईल.

या कार्यक्रमात कंपनी आयओएस व्हर्जन 14 फीचर्सबाबत माहिती देऊ शकते. यात फिटनेस अ‍ॅप्स, पेंसिलफेट, आयमेसेज फीचर आणि माउस कर्सर सारखे फीचर असतील. यादरम्यान कंपनी वॉचओएस7 मधील नवीन फीचरची माहिती देईल.  दरम्यान, 19 मे पासून मायक्रोसॉफ्टने देखील बिल्ड कॉन्फ्रेंसची ऑनलाईन आयोजन केले आहे.

Leave a Comment