200 रुपये घेऊन कारने लॅम्बोर्गिनी खरेदी करायला निघाला 5 वर्षीय मुलगा, पुढे काय झाले पहा

खेळण्यांशी खेळण्याच्या वयात एखादे लहान बाळ चक्क कार चालवताना दिसले तर ? तुम्हाला नक्कीच यावर विश्वास बसणार नाही. मात्र अमेरिकेतील उताह येथील एक 5 वर्षीय मुलगा चक्क खिशात 3 डॉलर (230 रुपये) घेऊन थेट लॅम्बोर्गिनी खरेदी करण्यास निघाला. विशेष म्हणजे हा मुलगा आपल्या पालकांची कार चालवत लॅम्बोर्गिनी खरेदी करायला कॅलिफोर्नियाला निघाला होता. मुलाला गाडी चालवताना पाहून पोलीस देखील हैराण झाले. या संदर्भात उताह पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली.

आईने लग्झरी कार खरेदी करण्यास नकार दिल्याने, रागाच्या मुलगा एसयूव्ही घेऊन कार खरेदी करण्यास निघाला. हा मुलगा ताशी 40 ते 50 किमी वेगाने कार चालवत होता. मुलाला थांबवल्यावर त्याला वय विचारल्यानंतर, वय ऐकून पोलीस देखील हैराण झाले. पोलिसांनीच मुलाला गाडी रस्त्याच्या कडेला घेण्यास मदत केली.

पोलिसांनी थांबवल्यावर मुलाने सांगितले की, तो लॅम्बोर्गिनी खरेदी करण्यासाठी कारने कॅलिफोर्नियाला चालला आहे. त्याच्याकडे 3 डॉलर होते. नवीन लॅम्बोर्गिनीची किंमत जवळपास 2 लाख डॉलर्स आहेत.

यामध्ये कोणालाही इजा झाली नसून, पालकांविरोधात तक्रार करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रोसेक्युटरवर आहे. ही घटना घडली त्यावेळी पालकांनी मुलाला त्याच्या भावंडाकडे सोडले होते.

Leave a Comment