हुबहू मायकेल जॅक्सन, तुम्हाला पटले?


फोटो साभार नवभारत टाईम्स
स्पॅनिश परफॉर्मर सर्जिओ कोर्टस याचे इन्स्टाग्राम अकौंट पहिले तर कुणीही सहज धोका खाईल कारण त्यावरचे फोटो प्रसिद्ध पॉप गायक मायकेल जॅक्सन याचे आहेत हे शपथेवर सांगायला कुणीही तयार होईल. खोटे वाटेल पण हे फोटो पाहून मायकेलच्या चाहत्यांनी मायकेल जिवंत आहे आणि या सर्जिओची डीएनए टेस्ट केली जावी अशी मागणीही केली होती. याला कारण होते ते सर्जिओ आणि मायकेल मध्ये असलेले अभूतपूर्व साम्य. दोन्ही फोटो एकत्र ठेवले तर मायकेल कुठला आणि सर्जिओ कुठला हे ओळखणे अवघड इतके दोघे सारखे दिसतात. जणू एकमेकांची प्रतिमाच.


जगात एकसारखी सात माणसे असतात असे म्हणतात. पण सर्जिओ इतका हुबेहूब मायकेल सारखा दिसतो की डोळ्यावर विश्वास ठेवणे अवघड. मायकेल जॅक्सनचा २५ जून २००९ मध्ये मृत्यू झाला आहे. सर्जिओचे इन्स्टाग्राम अकौंट व्हेरीफाईड आहे त्यामुळे त्याचे फोटो ही फसवाफसवी नाही. सर्जिओ मायकेलचा लहानपणापासूनच फॅन होता. १९८० मध्ये तो हायस्कूल मध्ये शिकत होता तेव्हा एका पत्रकाराने त्याचे मायकेलशी असलेले साम्य हेरले आणि सर्जिओला त्याच्यासारखा मेकअप करण्याचा सल्ला दिला. त्याला सुरवातीला मजा वाटली पण हळूहळू खरोखरच सर्जीओचे बोलणे, गाणे, डान्स आणि दिसणे हुबेहुब मायकेल सारखे झाले. आता तो मायकेलला श्रद्धांजली म्हणून त्याच्याच गाण्यावर परफॉर्म करतो.

असेही सांगतात की मायकेलला या त्याच्या डुप्लीकेटची माहिती होती आणि मायकेलने त्याच्या लग्नात १९९४ मध्ये मिडीयाचे लक्ष विचलित करण्यासाठी सर्जीओला पैसे देऊन विवाह स्थळी बोलावले होते.

Leave a Comment