एलजीने आणला सर्वात मोठा आणि महागडा टीव्ही


फोटो साभार डिजिटल ट्रेंड्स
कोरियन कंपनी एलजीने नुकताच सर्वात मोठा आणि महागडा टीव्ही सादर केला असून तो एलजी सिग्नेचर सिरीजचा एक भाग आहे. दोन मॉडेल मध्ये हा टीव्ही आला असून एक ८८ इंची तर दुसरा ७७ इंची आहे. दोन्ही साठी ८ के रेझोल्यूशन आणि ओलेड स्क्रीन दिला गेला आहे.

या टीव्हीवर अन्य टीव्हीच्या तुलनेत शार्प इमेज दिसेल. दोन्ही टीव्हीचे डिझाईन शानदार आहे आणि त्याला एलई थिन व्हॉईस असिस्टंट सपोर्ट दिला गेला आहे. फ्रंटला ६० डब्यूचे स्पीकर आहेत त्यामुळे युजरला घरबसल्या सिनेमॅटीक अनुभव मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी अनेक फिचर्स दिली गेली आहेत. ८८ इंची साठी स्टँड आर्टिस्टीक स्कल्पचर डिझाईन तर ७७ इंची साठी वॉल ब्रॅकेट सह गॅलरी डिझाईन आहे. ८८ इंची टीव्हीची किंमत ३४६७६ डॉलर्स म्हणजे २६.२५ लाख रुपये तर ७७ इंचीसाठी २३४३० डॉलर्स म्हणजे १७.७४ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment