अशी आहे किंग खानची अलिशान व्हॅनिटी व्हॅन


फोटो साभार डेली मोशन
बॉलीवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख यांची राहणीही राजाला साजेशीच आहे. बहुतेक सर्व बड्या बॉलीवूड कलाकारांच्या स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅन आहेत. शाहरुखही त्याला अपवाद नाही. मात्र त्याची व्हॅनिटी व्हॅनही किंग साईजच आहे. सर्वसामान्य व्हॅनिटी व्हॅनच्या आकाराच्या दुप्पट आकाराची ही व्हॅनिटी व्हॅन वोल्वो बीआर ९ मॉडेलवर प्रसिद्ध कार कस्टमायझर दिलीप छाबडीया यांनी डिझाईन केली आहे. बॉलीवूड कलाकारांचे दिलीप छाबडीया विशेष पसंतीचे डिझायनर आहेत.

किंग खानची व्हॅनिटी व्हॅन लग्झरी व्हॅन तर आहेच पण तिचे फिचर्सही हायटेक आहेत. तिला टॉप क्लास इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, बेस्ट इन क्लास फर्निचर आणि महागड्या इंटिरीअरने सजविले गेले आहे. या व्हॅनिटी व्हॅनला पार्किंग साठी ८ ते १० कार्स इतकी जागा लागते पण ही व्हॅनिटी व्हॅन आकाराने लहान मोठी करता येते. आयपॅडने कंट्रोल करता येणाऱ्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पँट्री, वॉर्डरोब, टॉयलेट, शॉवर एरिया, मोठा एलईडी टीव्ही, सेंट्रलाइज एसी असून तिचा तळ पूर्ण काचेचा आहे. या व्हॅनिटी व्हॅन साठी किंग खानने ४ कोटी रुपये मोजले आहेत असे सांगितले जाते. या किमतीत नॉर्मल ४ ते ५ व्हॅनिटी व्हॅन खरेदी करता येतात.

Leave a Comment