World Asthma Day : जाणून घ्या अस्थमाची लक्षणे आणि उपचार

अस्थमा हा श्वसनासंबंधी एक आजार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. या वर्षी आज म्हणजेच 5 मे ला हा दिवस पाळला जात आहे. अस्थमाची समस्या असणाऱ्यांना फुफ्फुसापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहचत नाही व श्वास घेण्यास त्रास होतो. गर्मीमध्ये काळजी न घेतल्यास अस्थमा अटॅकचे कारण ठरू शकते. अस्थमाचे लक्षण कसे ओळखायचे आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे, याविषयी जाणून घेऊया.

कोणत्या कारणांमुळे होतो अस्थमा ?

अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. सोबतच स्मोकिंग, वायू प्रदूषण, धूळ, धूर, कॉस्मेटिक आणि अगरबत्ती सारख्या सुगंधित वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो. काही अँटी-बायोटिक औषधे, तणाव आणि सिगरेट देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

अस्थमाचे लक्षण –

श्वास घेण्यास समस्या, श्वास घेताना शिटीचा आवाज येणे, खोकला येणे, छातीत दुखणी ही अस्थमाची लक्षणे आहेत.

उपचार –

अस्थमा पुर्णपणे नाहीसा करण्यासाठी कोणताही उपचार नाही. मात्र यावर नियंत्रण मिळवता येते. अस्थमाला नियंत्रण करण्यासाठी औषधांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. यासाठी इंहेलर्स सर्वात चांगले औषध आहे. इंहेलर्सने औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोहचते, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो.

अस्थमापासून वाचण्यासाठी –

अस्थमाच्या रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. औषध वेळेवर घ्यावे, थंड आणि आंबट वस्तूंचे जास्त सेवन करून नये. धूळ, धूर आणि धुम्रपानापासून लांब राहावे. पाळीव प्राणी जसे की कुत्रे, मांजर यांच्या संपर्कात जास्त येऊ नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment