मूळ भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे. आता त्या न्यूयॉर्कच्या पुर्व जिल्ह्यातील न्यायालयाच्या न्यायाधीश बनतील.
अमेरिकेच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश बनणार भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी
अमेरिकेत वकील सरिता कोमातीरेड्डी या प्रोसेक्यूटर असून, कोलंबिया लॉ स्कूलमध्ये कायदा शिकवतात. सरिता यांचे कुटुंब भारतीय असले तरी, त्यांचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे. त्यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी घेतली आहे.
त्यांनी कोलंबिया सर्किट जिल्ह्याच्या अपील न्यायालयात तत्कालीन न्यायाधीश ब्रेट कॅव्हानोचे कायदा लिपिका म्हणून काम केले आहे. त्या सध्या अटॉर्नी कार्यालय, न्युयॉर्कमध्ये पुर्व जिल्हा न्यायालयात सामान्य गुन्ह्याच्या उपप्रमुख आहेत. जून 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत त्या आंतरराष्ट्रीय नारकोटिक्स आणि मनी लाँडिंगच्या देखील उपप्रमुख होत्या. त्याआधी 2016 ते 2019 दरम्यान त्यांनी कॉम्प्युटर हॅकिंग आणि बौद्धिक संपत्तीचे समन्वयक म्हणून काम केले आहे.
आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची निवड केल्याचे सांगितले जाते. भारतीय वंशाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र असे असले तरी सरिता यांच्या कामगिरीचे देखील मोठे योगदान आहे.